News

कोल्हापूरला कायम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव प्राप्त करून देणाऱ्या प्रख्यात स्त्रीरोग व वंध्यत्व तज्ञ डॉ. पद्मा रेखा शिशिर जिरगे यांची Maharashtra chapter of ISAR (Indian Society of Assisted Reproduction) या नामांकित संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. हे बहुमानाचे पद डॉ. पद्मा रेखा जिरगे यांना दि ९ जुलै रोजी नागपूर येथे पार पडलेल्या परिषदे मध्ये बहाल करण्यात आले आहे. या परिषदेत डॉ. पद्मा रेखा जिरगे यांनी वंध्यत्व क्षेत्रातील सध्याच्या व भविष्यातील विविध पैलूंवर मोलाचे मार्गदर्शन केले.

डॉ. पद्मा रेखा जिरगे विविध संशोधन तसेच प्रत्यक्ष रुग्ण उपचार याद्वारे कायमच समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य अविरतपणे पार पाडत आहेत. वंध्यत्व उपचारांमध्ये त्यांचे संशोधन हे नक्कीच अनेक पेशंटस् साठी वंध्यत्व निवारण करण्यासाठी बहुमोल ठरत आहे.पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुर सारख्या तुलनेने छोट्या जिल्ह्यासाठी डॉ. पद्मा रेखा जिरगे यांची ही निवड खूप अभिमानास्पद आहे.

पुढील दोन वर्षे डॉ.पद्मा रेखा जिरगे हा पदभार सांभाळतील .वंध्यत्व रुग्णांना यशस्वी व सर्वोत्तम उपचार देण्याच्या दृष्टीने या क्षेत्रातील सर्वांसाठीच त्यांची ही निवड सार्थ ठरणार आहे .या दोन वर्षात त्यांच्याद्वारे केल्या जाणाऱ्या कार्यपद्धती बद्दल त्यांनी माहिती दिली .त्यात पुढील गोष्टींचा समावेश असेल असे त्यांनी सांगितले .

  • आयव्हीएफ स्पेशालिस्ट ना आयव्हीएफ सेवा देण्यासाठी गरजेचे असणारे सर्व प्रकारचे अद्ययावत व प्रगत एज्युकेशनल मटेरियल उपलब्ध करून देण्यात येईल.
  • आयव्हीएफ क्षेत्रात काम करणारे व या क्षेत्राचा कणा असणारे Embryologist यांना ट्रबल शूटिंग साठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येईल
  • आयव्हीएफ नर्सेस हा देखील या क्षेत्राचा खूप महत्त्वाचा भाग असून त्यांची भूमिका त्यांनी अधिक सक्षमपणे पार पाडण्याच्या दृष्टीने एक Uniform online programme चे आयोजन केले जाईल.
  • तसेच सर्व स्टाफ साठी प्रोफर्टिलिटी कौन्सिलिंग साठी एक प्रोग्राम आयोजित केला जाईल. या दोन वर्षात संपूर्ण महाराष्ट्राला आयव्हीएफ क्षेत्रात प्रगती पूर्ण पथावर नेण्यासाठी डॉ.पद्मा रेखा जिरगे यांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे ठरणार आहे